कौतुकास्पद! आईला 500 वर्षे जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदे यांनी लढविली शक्कल; वाचून आश्चर्यचकित व्हाल

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे तुम्हाला माहिती असतीलच, असे खूप कमी लोक आहेत ज्यांनी सयाजी शिंदे यांचा एकपण चित्रपट पाहिला नाही. मराठी चित्रपट सृष्टीच सोडा पण त्यांनी हिंदी, तेलगू, कन्नड या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

सयाजी शिंदे यांच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाने तर मराठी चित्रपट सृष्टीत धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने त्यांना विशेष ओळख निर्माण करून दिली होती. आणखी देखील या चित्रपटाला लोक आवडीने पाहतात. असे अनेक चित्रपट त्यांचे सुपर ठरले आहेत. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील खूप चांगले काम केले आहे.

Advertisement

 

सयाजी शिंदे हे त्यांच्या आईला 500 वर्षे जिवंत ठेवणार आहेत, हे टायटल वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण हे खर आहे. आपल्या आई वडिलांना जीवंत ठेवण्यासाठी लोक आटापिटा करत असतात. मात्र कोणी 500 वर्षे जिवंत ठेवणार असे छाती ठोक पने सांगितलं नाही. मानवाला जास्तीत जास्त 100 वर्षांचे आयुष्य आहे.

Advertisement

 

मात्र तोच मानव 500 वर्षे जगणार हे वाक्य ऐकून आश्चर्य वाटते. मात्र मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक शक्कल लढविली आहे. यामुळे त्यांच्या आईचा पुढील 500 वर्षे सहवास या भूमीला लागणार आहे. अभिनेते सयाजी शिंदे हे त्यांच्या आईवर खूप प्रेम करतात. सयाजी यांना वृक्षरोपनाची आणि वनराईची फार आवड आहे.

 

कदाचित सिने सृष्टीतील ते एकमेव अभिनेते आहेत, जे काम करत करत आवड जोपासत आहेत. सयाजी शिंदे यांनी आपली आई 500 वर्षे जिवंत राहावी यासाठी एक अनोखी शक्कल लढविली आहे. ते एका कार्यक्रमात म्हणाले की मी माझ्या आईच्या वजनाच्या झाडांच्या बिया एकत्र करून त्या पूर्ण महाराष्ट्रभर लावणार आहे.

 

म्हणजे एका तराजूत माझी आई आणि एका तराजूत बिया घेऊन त्या बीया पूर्ण महाराष्ट्र राज्यात लावणार आहे. यामुळे माझी आई त्या झाडांच्या रूपाने माझ्या सहवासात राहील. असे उद्गार त्यांनी काढले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी वृक्षरोपण केले आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *