आत्महत्येपूर्वी अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येपूर्वी होती अशी मनस्थिती.. वैशालीच्या मित्रानेच केलं भाष्य

इंदूर| टीव्ही विश्वात खळबळ उडाली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीने अचानक हे पाऊल कसे उचलले हे त्याच्या जवळच्या लोकांना समजू शकलेले नाही. अभिनेत्रीने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटसुद्धा लिहली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहात होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. आता त्या नोटमधून तिच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.

Join WhatsApp Group

 

अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी ती सायकॅट्रिस्टची मदत घेत होती. आत्महत्या करण्यापूर्वी वैशालीची नेमकी मनस्थिती कशी होती याची माहिती तिचा मित्र निशांत सिंग मल्कानी यांनी दिली आहे. राहुल वैशालीला मुव्ह ऑन करू देत नव्हता. ती डिप्रेशनमध्ये आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्याशी चार दिवस आधी संवाद साधला होता, असं निशांत यांनी सांगितलं.

 

वैशाली ठक्करचा मित्र निशांत मल्कानी काय म्हणाल:
निशांत मल्कानी यांनी ई टाईम्सशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. वैशाली डिप्रेशनमध्ये होती आणि ती मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होती. तिला किती त्रास होत होता आणि ती किती डिप्रेशनमध्ये होती याचा आता मला अंदाज येत आहे, असं निशांतने सांगितलं.

 

वैशाली आणि राहुलने एकमेकांशी डेट करण्यास सुरुवात केली. तेव्हा राहुल विवाहित नव्हता. या दोघांच्या नात्याशी त्याचे नातेवाईक सहमत नव्हते. त्यामुळे त्यांचा विवाह झाला नाही. मात्र, दिशा सोबत विवाह केल्यानंतर राहुल वैशालीला इमोशनली ब्लॅकमेल करत होता. तिचा विवाह ठरल्यामुळे ती आनंदी होती. अस त्याने सांगितल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button