आत्ताच्या घडामोडीबॉलीवुड

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मोठा अपघात; गंभीर जखमी, रूग्णालयात दाखल

मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. नव्वदच्या दशकात तिच्या रोमँटिक चित्रपटांनी तिने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य गेले. अशात आता शिल्पाच्या संदर्भात एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचा एक अपघात झाला असून तिला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

 

उपचार करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहेत. तसेच तिचे चाहते तिच्या विषयी चिंता व्यक्त करत आहेत. लवकरात लवकर तिला बरे वाटावे अशी अनेक जण प्रार्थना करत आहेत. तिच्या व्हायरल होतं असलेल्या फोटोवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

 

दोन दिवसांपूर्वीच एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ॲक्शन सीन करत असताना तिला दुखापत झाली. यात तिच्या पायाचे हाड मोडले आहे. यावेळी तात्काळ डॉक्टरांना तिथे बोलावले गेले. डॉक्टरांनी तिच्या पायाला मलम पट्टी लावली असून तिला सहा आठवडे विश्रांती घेण्यास सांगितले आहे. शिल्पाने स्वतः देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मलमपट्टी करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या पायाला झालेली दुखापत दिसते आहे. मात्र या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर स्माईल देखील आहे. त्यामुळे ती कितीही कठीण प्रसंग असला तरी धीराने त्याला सामोरे जाते हेच यातून समजते आहे.

 

तसेच शिल्पाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ते म्हणाले रोल कॅमेरा ॲक्शन आणि माझा पाय तुटला. आता सहा आठवडे मला कोणतीच हालचाल करता येणार नाही. पण मी लवकरच आणखीन स्ट्रॉंग होऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत तुमचे आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या. तुमची लाडकी शिल्पा शेट्टी कुंद्रा….” असे तिने यात लिहिले आहे.

 

शिल्पाच्या या फोटोवर मनीष मल्होत्रा ने कमेंट करत म्हटलं आहे की, ” तू लवकरात लवकर बरी हो शिल्पा” तर तिच्या बहिणीने लिहिलं आहे की, ” माझी मुनकी खूप स्ट्रॉंग आहे, त्यातून लवकरच बरी होईल.” तसेच अनेक कलाकारांनी यावर शिल्पाचा पाय लवकर ठीक व्हावा अशी प्रार्थना केली आहे. शिल्पा शेट्टी ही रोहित शेट्टीच्या “इंडियन पोलीस फोर्स” या आगामी चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसणार आहे.

 

याच चित्रपटाचा ॲक्शन सीन शूट करत असताना तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. चित्रपटामध्ये तिच्याबरोबर विवेक ओबेरॉय देखील झळकणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा हा देखील विशेष पात्र साकारताना दिसणार आहे. शिल्पाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत ती कधीच झळकली नाही. रोहित शेट्टीच्या या आगामी चित्रपटात ती एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सिंघम आणि सिंबा अशा चित्रपटांच्या सीरिज मधला आहे. सदर चित्रपट हा ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button