अभिनेत्री कल्याणी जाधवच्या थरारक अपघाताचा मोठा खुलासा; असा झाला अपघात, घातपात की अपघात?

कोल्हापूर | मराठी चित्रपट सृष्टीला धक्का देणारी बातमी गेल्या दोन दिवसांपूर्वी घडली, या बातमीने पूर्ण मराठी कला विश्वात शोककळा पसरली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम करून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी मराठी अभिनेत्री कल्याणी अभिजित कराळे जाधव हीचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.
घडलेली संपूर्ण घटना ही अतिशय हृदयद्रावक होती. या घटनेनं पूर्ण परिसरच नाही तर पूर्ण राज्यात शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री कल्याणी जाधव हिने नुकताच आपला वाढदिवस थाटामाटात साजरा केला होता. तसेच तिने अभिनय सोडून हॉटेल व्यवसायामध्ये देखील पाऊल टाकले होते. हॉटेल चे नाव देखील एका विशेष पद्धतीने ठेवण्यात आले होते.
कोल्हापूर मधील हलोंडी फाटा येथे तिने प्रेमाची भाकर या नावाचं एक हॉटेल चालू केलं होत. या हॉटेल च्या माध्यमातून तिने अनेक स्वप्ने पाहिली होती. अभिनय आणि त्यासोबत हॉटेल व्यवसाय करण्याचे तीच स्वप्न होत. मात्र नियतीने तिची साथ सोडली आणि होत्याचं नव्हतं झालं. अभिनेत्रीचे अपघातात निधन झाले.
अभिनेत्री कल्याणी आणि तिची एक मैत्रीण दोघी हॉटेल बंद करून घरी परत जात होत्या. त्यांच्या कडे दुचाकी गाडी होती. या दुचाकी गाडीला एका ट्रॅक्टरने मागून धडक दिली. त्यामुळे कल्याणी रस्त्यावर पडली. आणि मागून येत असलेल्या टीपरने तिला धडक दिली. यामुळे ती खुपचं गंभीर जखमी झाली. तिला लगेच रुग्णालयाच्या दिशेने हलविण्यात आले.
मात्र उपचार करण्याच्या अगोदरच तिने जगाचा निरोप घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महादेव बाबुराव पाटील याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. नेमका हा घात की अपघात? यावर देखील चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कल्याणीच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.