ऐश्वर्या राय बरोबर काम केलेला अभिनेता झाला अचानक गायब; सध्या करतोय हे काम

मुंबई | मनोरंजन विश्व इतके मोठे आहे की प्रत्येक दिवसाला इथे अनेक व्यक्ती अभिनेता आणि अभिनेत्री व्हायचे स्वप्न घेऊन पदार्पण करत असतो. त्यामुळे इथे दिवसेंदिवस स्पर्धा ही प्रचंड वाढत चाललेली आहे. मनोरंजन क्षेत्रात नवीन चेहरा आला की प्रेक्षक जुना चेहरा विसरून जातात. असे करता करता अनेक नवीन चेहरे बॉलीवूड मध्ये दाखल झालेले आहेत. हे कलाकार बॉलीवूड प्रचंड गाजवत आहेत. मात्र यामुळे जुने कलाकार मागे पडले असून त्यांच्याजवळ कोणतेही काम राहिलेले नाही. यातील काही कलाकारांनी स्वतःच बॉलीवूड सोडून दिले आहे.

Join WhatsApp Group

 

यातीलच एक अभिनेता चंद्रचूर. अभिनेत्री ऐश्वर्या राय बरोबर आजवर अनेक मोठमोठ्या कलाकारांनी स्क्रीन शेअर केली आहे. तिच्या सौंदर्यावर आजही अनेक जण फिदा आहेत. ऐश्वर्या राय बरोबर काम करायला मिळावे अशी अनेक कलाकारांची इच्छा आहे. यात नव्वदच्या दशकात तिने सलमान खान शाहरुख खान तसेच अजय देवगन अशा अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. तिचा जोश हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये चंद्रचूर या अभिनेत्याने ऐश्वर्या बरोबर प्रथमच बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटामधून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

 

या चित्रपटामध्ये ऐश्वर्या बरोबर बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने देखील स्क्रीन शेअर केली होती. मात्र यावेळी देखील चंद्रचूर आणि ऐश्वर्या या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दोघांचे ट्यूनींग प्रेक्षकांना फार आवडायचे. मात्र साल 2017 नंतर चंद्रचूर अभिनय क्षेत्रात दिसला नाही. हळूहळू त्याने रुपेरी पडद्यावर झळकने बंद केले.

 

असे असले तरी तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहतो. नुकताच त्याचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये त्याचा लूक फार वेगळा दिसत आहे. यात अनेक व्यक्ती त्याला पाहून हा जोश चित्रपटातलाच चंद्रचूर आहे का असं म्हणत आहेत.

 

जोशी या चित्रपटांमध्ये झळकण्याआधी त्याने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली होती. ज्यामध्ये आवारगी, तेरे मेरे सपने, माचीस, बेताबी, दिल किया क्या करे, फायर, सिलसिला है प्यार का अशा चित्रपटांचा समावेश आहे. जोशा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला चांगलीच कलाटणी मिळाली. त्यानंतर त्याने क्या कहना या चित्रपटात काम केले. आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या हा चित्रपट देखील प्रचंड गाजला.

 

सध्या सोशल मीडियावर त्याचा जो फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये त्याच्यात कमालीचा बदल झालेला दिसत आहे. तो आता 53 वयाचा झाला आहे. त्याचा चेहऱ्यावर त्याचे वय पटकन समजून येत आहे. मोठ्या ब्रेकनंतर तो आता बॉलीवूडमध्ये पदार्थ करत आहे. अक्षय कुमार याचा मुख्य भूमिकेत असलेला कटपुतली हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये चंद्रचूरची देखील महत्वपूर्ण भूमिका आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button