300हून अधिक चित्रपट आणि अल्बममध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा मृत्यू…

दिल्ली | आसामी अभिनेता आणि गायक किशोर दास याचे शनिवारी निधन झाले. वयाच्या 30 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. तो बराच काळ कर्करोगाने त्रस्त होता. चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याने खूप कमी वयात अखेरचा श्वास घेतला. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच त्याचे चाहते आणि जवळच्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.

 

सामोर आलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळापासून तो कर्करोगाशी झुंज देत होता. मात्र दीर्घ लढ्यानंतर शनिवारी त्याची ही जीवनाची लढाई तो हरला. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. कर्करोगाशिवाय किशोर दासला कोरोना विषाणूची देखिल लागण झाली होती. कॅन्सरच्या काळात कोरोनामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

 

किशोर दास हा एक प्रसिद्ध कलाकार होता. त्याने खूप कमी काळात 300 हून अधिक म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. याशिवाय तो टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध कलाकारही होता. अनेक शॉर्ट फिल्ममध्ये देखील त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

 

त्याने इंडियाज गॉट टॅलेंट आणि डान्स दांडिया डान्समध्येही भाग घेतला होता. तो मॉडेल हंटचा पहिला उपविजेता होता. वर्ष 2020-21 मध्ये, किशोरला सर्वात लोकप्रिय अभिनेत्यासाठी एशियानेट आयकॉन पुरस्काराच्या किताबवर देखील त्याच नावं कोरलं होतं.

 

काही दिवसांपूर्वीच त्याने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये दिसत होता. या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, “जे तुम्हाला मारत नाही तेच तुम्हाला मजबूत बनवू शकते” ही माझी केमोथेरपीची चौथी सायकल आहे. तुम्हाला वाटेल की ते सोपे होईल पण दुर्दैवाने तसे होत नाही.

 

या दिवसांमध्ये, मला थकवा, मळमळ, चक्कर येणे, शरीराची कमजोरी, उलट्या इत्यादींसह अनेक दुष्परिणामांचा त्रास झाला आहे. मी माझ्या डॉक्टरांना सांगितल्याशिवाय इतर औषधे देखील घेऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, स्टेज 4 कोलन कॅन्सरचे निदान झाल्यापासून आणि विशेषत: केमोथेरपीच्या वेळी वास्तव काहीही नाही. मला आशा आहे मी ठीक होण्यासाठी तुम्ही प्रार्थना कराल” मात्र दुर्दैवाने या अभिनेत्याने शनिवारी मृत्यूला कवटाळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button