आत्ताच्या घडामोडी

अभिनेता विजयचा कार अपघात; गंभीर जखमी झाल्याची माहिती

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. कला विश्वातील अनेक दिग्गज जगाचा निरोप घेत आहेत. तर काहींच्या अरोग्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

 

भारताची क्रश म्हणून ओळखली जाणारी समंथा रूथ प्रभू आणि अभिनेता विजय यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात खळखळ उडाली आहे. सध्या ते डिसेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या कुशी या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत.

 

समंथा ही तिच्या अभिनयामुळे पूर्ण भारत देशाची क्रश बनली आहे. तसेच अभिनेता विजय देखील देशाचा एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जातात. या दोन्ही कलाकारांनी एकमेकांसोबत अनेक चित्रपट बनविले आहेत.

 

या दोन्ही कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून जातात. आगामी काळात कुशी या चित्रपटात दोघे झळकणार आहेत. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे.

 

मात्र याच दरम्यान एक अवघड स्टंट करताना हे दोन्ही कलाकार गंभीर जखमी झाले आहेत. काश्मीर मध्ये सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. पहलगाम भागात एक स्टंट करत असताना त्यांची गाडी खोल पाण्यात पडली आहे.

 

यात दोघांच्या पाटीला गंभीर मार लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नदीच्या कडेला एक दोरी बांधली होती. त्या दोरीवरून गाडी चालवायची होती. मात्र सदर स्टंट करत असताना, गाडी दोरीवरुन पडून खोल पाण्यात पडली. यामुळे दोघांच्या पाटीला मार लागला.

 

त्यानंतर त्यांना लगेच जवळच्या एका हॉटेल मध्ये नेण्यात आले, त्यानंतर तात्काळ डॉक्टरांची टीम त्यांच्याकडे येऊन उपचार केले आहेत. उपचाराच्या दरम्यान त्यांच्या जवळ कोणालाही येऊन दिले नाही. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button