आत्ताच्या घडामोडी

सुनील बर्वे यांची पत्नी पाहिलीत का? दिसते खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम?

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुनील बर्वे तुम्हाला माहीतच असेल, त्याने अनेक चित्रपटात भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सुनील बर्वे हा मराठी अभिनेता आहे. मात्र त्याने त्याच्या कला कारकिर्दीत हिंदी आणि गुजराती नाटक विश्वात देखील काम केले आहे.

 

त्याच्या आयुष्यात या क्षेत्रात त्याला यशस्वी होण्यासाठी फार काळ त्याला वाट पाहावी लागली. सुरुवातीला त्याला छोट्या पडद्यावर काम मिळू लागले. त्यानंतर त्याने मोठया पडद्यावर काम करण्यास सुरुवात केले आणि तो उंच शिखरावर जाऊन पोहचला.

 

त्याने लेक माझी लाडकी, दुनियादारी, जमलं हो जमलं, देऊळ बंद, धप्पा, तू तिथे मी या दिग्गज चित्रपटात काम केले. तू तिथे मी या चित्रपटाने तो प्रकाश झोतात आला. सुनील याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

 

त्यामुळे त्याच्या विषयी जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. आज आम्ही त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. सुनील बर्वे यांच्या पत्नीचे नाव अपर्णा आहे.

 

सुनील ज्यावेळी 12वी मध्ये शिक्षण घेत होता, त्यावेळी अपर्णा ही 11वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. त्यानंतर सुनीलला अपर्णा आवडू लागली. मात्र सुनील हा टुकार मुलांमध्ये फिरत असल्यामुळे अपर्णाने त्याला नकार दिला.

 

त्यानंतर त्याने तिच्यावर प्रेम करणं सोडलं नाही. आणि अखेर ती हो म्हणाली आणि दोघांनी लग्न केले. अपर्णा ही. सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही जोडी कायम अशीच राहावी, ही चाहत्यांची इच्छा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button