आत्ताच्या घडामोडी

बॉलिवूड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्याचं हृदयविकराच्या झटक्याने निधन; चित्रपट सृष्टीवर शोककळा

मुंबई | गेल्या अनेक दिवसापासून भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे. लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी यांच्या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

अनेक वर्ष चित्रपट सृष्टीत काम करून अभिनेते जगाचा निरोप घेत असल्यामुळे रसिकांना मोठ्या दुःखाचा सामना करावा लागत आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने तर पूर्ण जगावर शोककळा पसरली होती. पूर्ण जगात शोक व्यक्त करण्यात आला होता.

 

लता मंगेशकर यांच्या दुःखातून सावरत असताना आणखी एका दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्याचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचे नाव सलीम घुस असे आहे. त्यांनी अनेक भाषांमधील चित्रपटात काम पाहिले आहे.

 

त्यांनी हिंदी, तेलगू, मल्याळम, इंग्रजी या भाषांमध्ये देखील काम पाहिले आहे. त्यांनी सुरुवातीला छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर काम मिळू लागले. भारत एक खोज या शो मुळे ते प्रकाश झोतात आले.

 

या मालिकेत त्यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारली होती. त्यांनी कोयला, महाराजा, द्रोही, चक्र, दास, सोलजर, त्रिकाल, शपथ या सारख्या अनेक दिग्गज चित्रपटांत ते मुख्य भूमिकेत दिसले होते. त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग होता.

 

सलीम यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज लोकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मावळली, याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी मीडिया सोबत बोलताना दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button