अभिनेते NTR यांच्या मुलीचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा

दिल्ली | आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांची मुलगी उमा माहेश्वरी हिने सोमवारी आत्महत्या केल्याची दुखद बातमी समोर आली आहे. 52 वर्षीय महेश्वरीने ज्युबली हिल्स येथील राहत्या घरी गळफास लावून घेतला. जुबली हिल्स पोलिसांना दुपारी २.३५ च्या सुमारास आत्महत्येची माहिती मिळाली.

 

पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ अन्वये याची नोंद केली आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी उस्मानिया रुग्णालयात पाठवला आहे. सुरुवातीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे माहेश्वरीचा मृत्यू झाल्याची बातमी होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र असे म्हटले जात आहे की महेश्वरी अनेक दिवसांपासून आजारी होती. याच आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केली.

 

तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) संस्थापक एनटी रामाराव यांच्या १२ मुलांपैकी उमा सर्वात लहान कन्या होती. उमा माहेश्वरीच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चार बहिणींमध्ये ती सर्वात लहान होती. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दग्गुबती पुरंदेश्वरी आणि टीडीपीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (एन. चंद्राबाबू नायडू) यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी ही तिची बहिणी आहे.

 

एनटी रामाराव हे तेलगू भाषेतील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध होते. ते आधी एक अभिनेता म्हणून दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर राज्य करत होते. नंतर त्यांनी राजकारणी होण्याचे ठरवले. त्यांनी 1982 मध्ये तेलुगू स्वाभिमानचा नारा देत टीडीपी पक्षाची स्थापना केली आणि नऊ महिन्यांत पक्षाला सत्तेत आणून एक प्रकारचा विक्रम केला.

 

त्यांनी तत्कालीन अविभाजित आंध्र प्रदेशातील काँग्रेसची सत्ता संपवली. 1996 मध्ये त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांना बंडखोरी करून सत्तेवरून हटवल्यानंतर काही महिन्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button