आत्ताच्या घडामोडी

प्रसिध्द अभिनेत्रीची झालीय खूपचं वाईट अवस्था; रुग्णालयात दाखल, पाहून डोळ्यात पाणी येईल

दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून चित्रपट सृष्टीला हादरे देणाऱ्या घटना घडल्या आहेत. अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. यात लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यामुळे चित्रपट सृष्टीला धक्क्यावर धक्के बसले आहेत. त्यामुळे 2022 हे वर्ष अभिनय क्षेत्रासाठी चांगले नसल्याचे सांगितले जातं होते. आज अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रसिध्द अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

सुमारे आठवडा भर रूग्णालयात उपचार घेतले, मुंबई मधील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांच्यावर विशेष उपचार करण्यात आले आहेत. प्रसिध्द अभिनेत्री मुमताज यांना Irritable Bowel Syndrome and Colitis नावाचा आजार झाला आहे.

 

याशिवाय त्यांना अतीसराचा झटका आल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे मुमताज यांच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 1958 साली त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.

 

त्यानंतर त्यांना अनेक बड्या चित्रपटात काम मिळाले. त्यांचे करोडोंच्या संख्येत चाहते आहेत. त्यांचे सध्याचे वय 74 वर्ष आहे. त्या एक वरिष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सध्या त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा आल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button