आत्ताच्या घडामोडी

एका चित्रपटासाठी महेश बाबू घेतो एवढे पैसे; वाचून थक्क व्हाल

दिल्ली | तेलगू चित्रपट सृष्टीतून येऊन पूर्ण भारत देशातील रसिकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे महेश बाबू, त्याने अनेक चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याचा एक विशिष्ठ चाहता वर्ग देखील आहे.

 

महेश बाबूने तेलगू सहित हिंदी सारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारली आहे. हटके अदा, आणि ट्रेडिशनल लूक मुळे तो कायम चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून देखील तो सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला होता.

 

यात तो म्हणाला होता की, मी बॉलिवूडला परवडणार नाही, त्यामुळे वेळ वाया घालवत नाही. असे महेश बाबू म्हणाला होता. त्यामुळे तो खूपचं चर्चेत आला होता. सोशल मीडियावर हे वक्तव्य खूपच चर्चेचा विषय ठरलं होते.

 

आज आपण महेश बाबू याची संपत्ती किती आणि तो किती मानधन स्वीकारतो याबाबत माहिती पाहणार आहोत. महेश बाबू हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप 5 कलाकारांपैकी एक आहे. तो बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन स्वीकारतो.

 

तो एका चित्रपटाचे शुट करण्यासाठी 30 ते 50 कोटीच्या आसपास मानधन घेतो. मात्र ती स्क्रिप्ट पाहून त्याची किंमत ठरते. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक महेश बाबू आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.

 

महेश बाबू हा फक्त मानधन स्वीकारत नाही तर तो सोशल मीडियावर प्रमोशन पोस्ट देखील घेतो. आणि त्याची किंमत देखील करोडो रुपये आहे. त्यामुळे तो महिन्याला करोडो रूपये अभिनय क्षेत्रातून कमवत असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button