मराठी कलाविश्वास शोककळा! केतनी माटेगावकरच्या भावाची आत्महत्या; मृत्यूपूर्वी लिहली सुसाईड नोट, म्हणाला….

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीला हादरा देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिध्द अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठी कला विश्व हादरलं आहे.

 

केतकी माटेगावकरचां चुलत भाऊ अक्षय अमोल माटेगावकर याने थेट इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. त्यामुळे माटेगावकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. अक्षय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.

Advertisement

 

अक्षयची आई मीनल या देखील प्राध्यापिका म्हणून काम पाहत आहेत. तर वडील एका नामांकित कंपनीत जॉब करत आहेत. मात्र नोकरी मिळत नसल्याच्या कारणारून अक्षयने आत्महत्या केली आहे. त्यामुळे हा सर्वांना मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement

 

याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी अक्षय याने एक सुसाईड नोट लीहली आहे. यात नोकरी मिळत नसल्याचे कारण त्याने लीहले आहे. अनेक दिवस प्रयत्न करून देखील नोकरी मिळाली नाही.

 

त्यामुळे तो नर्वस झाला आणि हे टोकाचं पाऊल उचललं आहे. याबाबत केतकी सोबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला आहे. या प्रकरणी काही कारण वेगळं तर नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिस याबाबत तपास करत आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *