आत्ताच्या घडामोडी

अभिनेत्री केतकी चितळेला अखेर अटक

पुणे | छोट्या पडद्यावर काम करणारी अभिनेत्री केतकी चितळेला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिच्या अटकेची मागणी वाढली होती.

 

अखेर तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत पोस्ट केली होती. त्यानंतर केतकिवर कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

त्यानंतर तिच्या अटकेची मागणी नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात केली जात होती. अखेर पोलिसांनी केतकीला अटक केली आहे. तसेच पुढील कारवाई सुरू आहे. केतकीला आजची रात्र पोलिस कोठडीत काढू लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

त्यामुळे हे वक्तव्य तिला चांगलेच भोवल आहे. केतकी या प्रकरणी जामीन अर्ज करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे तिचा जामीन होणार की तिला काही दिवस जेलमध्ये बसावं लागणार हे पुढील काही तासात कळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button