आत्ताच्या घडामोडी

‘मन उडू उडू झालं’ मधील दिपूने सोडली मालिका; धक्कादायक कारण आले समोर

पुणे | फुलपाखरू या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे तुम्हाला माहित असेल, मराठी अभिनेत्रींच्या लोकप्रियतेच्या बाबतीत हृता ही सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळाले.

 

तिचे सोशल मीडियावर चांगलेच चाहते आहेत. तिला Instagram वर 2 मीलियन्स लोकांनी फॉलो केले आहे. सध्या ती एका मालिकेमध्ये का करत आहे. ती म्हणजे मन उडू उडू झालं या मालिकेत ती गेल्या काही दिवसांपासून झळकत आहे.

 

मात्र तिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मालिकेतून तिने एक्झीट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात नाराजीचा सुर पसरला आहे. मालिका सोडण्याचे कारण देखील धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार शुट्टींग सुरू असताना तेथील स्वच्छतेच्या कारणावरून वाद झाल्यामुळे ही मालिका सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवसात करार संपल्यानंतर हृता ही मालिका सोडणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button