गोविंदाची पत्नी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | बॉलिवूडला आपल्या अभिनयाने हिट ठरवणारा अभिनेता गोविंदा आजही सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याचा अभिनय नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे. त्याच्या कारकीर्दीत त्याने अनेक हिट चित्रपट या बॉलीवूडला दिले आहेत. आज या बतनितून त्यांच्या पत्नी विषयी जाणून घेणार आहोत.
गोविंदाचा जन्म २१ डिसेंबर १९६३ मध्ये झाला. अभिनेता अरुण कुमार गायिका आणि अभिनेत्री निर्मल देवी यांचा गोविंदा हा सर्वात लहान मुलगा आहे. घरात सगळ्यात लहान आल्याने सगळ्यात जास्त त्याचे लाड केले जात होते. तसेच त्याला सर्व जण चीची या नावाने हाक मारायचे. चिची म्हणजे सर्वात छोटे बोट.
गोविंदाने सुरवातीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. याच काळात त्याने लव मॅरेज केले होते. मात्र या विषयी त्याने कुणालाच काहीच सांगितले नाही. या काळात त्याच नाव अनेक नामवंत अभिनेत्रीबरोबर जोडले गेले. अशात त्याच्या लग्नाचे गुपित फार काळ टिकले नाही. त्याच्या पत्नीचे नाव सुनीता आहे. सुनिता बरोबर विवाह केल्यावर त्यांना नर्मदा ही मुलगी झाली. त्यामुळे गोविंदा विवाहित आहे हे सर्वांना समजले. मुलीच्या जन्मानंतर त्याने स्वतःच सर्वांना याची माहिती दिली होती.
गोविंदा आजही त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो. विशेष म्हणजे या दोघांनी दोन वेळा लग्न केलं आहे. कारण पहिल्यांदा या दोघांचं लव मॅरेज कोर्टात झालं होतं. त्यामुळे गोविंदाच्या आईची अशी इच्छा होती की त्याने पुन्हा एकदा पूर्ण रितीरिवाज पूर्ण करत लग्न करावे. साल १९८७ मध्ये त्याचे पाहिले लग्न झाले होते. त्यानंतर साल २९१५ मध्ये या दोघांनी पुन्हा एकदा विवाह केला. आता या दोघांना नर्मदा आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत.
गोविंदा सध्या अभिनयात सक्रिय नाही. आपल्या कुटुंबाबरोबर तो मस्त आयुष्य जगतो आहे. त्याची पत्नी देखील आता खूप जाडी झाली आहे. अनेकदा तिच्या लठ्ठ पणामुळे तिला ट्रोल केलं गेलं आहे. मात्र अस असल तरी गोविंदा त्याच्या प्रनिवर जीवापाड प्रेम करतो.