अभिजित खांडेकरची पत्नी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिजीत खांडकेकर आज घराघरात पोहचला आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत यशाचे शिखर गाठले आहे. अभिजित सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करतो. त्याचा अभिनय खरोखर कौतुकास्पद आहे.
अभिजीतने २०१३ साली सुखदा बरोबर लग्न केले. सुखदा देखील एक अभिनेत्री आहे. तिने काही नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार सीजन १ मध्ये अभिजीत दिसला होता. यावेळी तो स्पर्धक म्हणून आला होता.
अभिजित आणि सुखदा हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते आपल्या चाहत्यांबरोबर नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करतात. नुकतेच हे दोघे पावसाळी सहलीला गेले होते. त्यावेळी दोघांनी देखील खूप मजा मस्ती केली. त्यांचे आनंदाचे क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुखदा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दिसायला खूप देखणी आहे. ती देखील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सुखदाने अनेकदा हॉट फोटोशूट देखील केले आहे. तसेच ती नेहमी ग्लॅमरस लूकमध्ये दिसते.