आत्ताच्या घडामोडी

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा अपघात; गंभीर दुखापत झाल्याची माहिती….

दिल्ली | आगामी काळात रोहित शेट्टी यांची एक बहुचर्चित वेब सिरीज रिलीज होणार आहे. ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म वर रिलीज करण्यात येणार आहे. सध्या या वेब सिरीजचे शुट सुरू आहेत. ही वेब सिरीज बिग बजेट असल्याची माहिती देखील आहे.

 

यात मुख्य भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. मात्र शुट करण्याच्या दरम्यान सिध्दार्थ चां अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात त्याच्या हाताला गंभीर स्वरूपात दुखापत झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

याबाबत खुद्द सिध्दार्थ ने इंस्टाग्राम वर व्हिडिओ शेअर करून माहिती दिली आहे. व्हिडिओ मध्ये दिसत असल्या प्रमाणे सिद्धार्थ हा अँक्शन सीन करत आहे. यात एका व्यक्तीला ढकलून दिल्यावर त्या ठिकाणी असलेल्या भिंतीच्या खांबाला मारत आहे.

 

त्याठिकाणी काही काचेचे तुकडे दिसत आहेत. ते तुकडे त्याला खरोखर लागले आहेत. त्याच्या हाताला गंभीर इजा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सध्या त्याचा हात व्यवस्थित असल्याची माहिती देखील मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button