‘इमली’ फेम अभिनेत्रीचा अपघात; शुटींग करून परत जात असताना…

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री यांच्यावर काळाने घाला घातला तर कोणाला दुखापत झाली. या सर्वांच्या निधनाने शोककळेत असतानाच आज परत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ईमली या शो मध्ये असणारी फेम अभिनेत्री हेतल यादव हीचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी रात्री शूटिंग करून परत येताना हा अपघात झाला आहे.
अपघात झाल्याची माहिती स्वतः हेतलं यांनी त्यांच्या पोस्टरून दिली आहे. तसेच पत्रकारांशी बोलताना म्हणाली की रविवारी ४ डिसेंबर रोजी शूटिंग करून परत येत असताना एका ट्रकने माझ्या कार ला पाठीमागून धडक दिली. ट्रक ने माझी कार बाजूला ढकलली गेली. माझी गाडी पडणार होती. पण कशी बशी मी गाडी थांबवली. मी माझ्या मुलाला बोलावले आणि पोलिसांना कळविण्यास सांगितले.
इंस्टाग्राम वर फोटो पोस्ट करत माहिती दिली – हेतल यादव या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत म्हणले की या अपघातात कोणतीही दुखापत झालेली नाही. दुसऱ्याच दिवशी शूटिंगला सुध्दा त्या पोहोचल्याचे दिसत आहे. त्या म्हणाल्या की मला पहाटेच शूटिंग ला जावे लागले. कारण महत्वाचा सीन चालू होता आणि माझ्याशिवाय शूटिंग थांबू नये असे मला वाटत वाटले.
हेतल यादव या इमली शो मध्ये शिवानी राणा या पत्राची भूमिका बजावत आहेत. गेल्या २५ वर्षा पासून हेतल या अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. हेतल यांना तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील ज्वाला या पात्रामुळे सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली. हेतल यादव यांच्या कारला अपघात झाला परंतु सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती त्यांनी स्वतः मिडियाशी बोलताना दिली.