लग्नाआधीच आलीय भट्ट होती गर्भवती; डीलेव्हरीची तारीख समोर येताच झाला खुलासा

मुंबई | बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहे. गेल्या महिन्यात आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. आलिया भट्टच्या बाळासाठी कपूर कुटुंबियाप्रमाणेच तिचे चाहतेही उत्सुक आहेत. नुकतंच तिच्या प्रसूतीची तारीख समोर आली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत ती बाळाला जन्म देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र यानंतर ती लग्नाआधीच गरोदर होती का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Join WhatsApp Group

 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यानंतर आलिया अनेकदा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. लग्नानंतर लगेचच गरोदरपणाची घोषणा करणाऱ्याला आलियाला ट्रोलही करण्यता आले. मात्र यावर तिने स्पष्ट भाषेत उत्तर दिले होते. त्यानंतर आता तिच्या प्रसूतीची तारीखही समोर आली आहे. आलिया भट्ट ही नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

आलियाची डिलिव्हरीची तारीख बरोबर असेल तर आलिया लग्नाआधी गरोदर होती, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न 14 एप्रिल 2022 रोजी मुंबईत झाले होते. त्यानुसार, लग्नापासून त्यांच्या प्रसूतीच्या तारखेपर्यंत केवळ 7 महिने पूर्ण होत आहेत, ज्यावरून स्पष्ट होतं की लग्नाआधीच आलिया प्रग्नेंट होती. कारण दोघांच्या लग्नाला नोव्हेंबरमध्ये 7 महिने पूर्ण होत आहेत.

 

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना दिली ‘गुडन्यूज’ – लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आलिया भट्टने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने हॉस्पिटलमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. सोनोग्राफी दरम्यानचा फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button