आत्ताच्या घडामोडीबॉलीवुड

एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या या दिग्गज अभिनेत्यावर आलीय खुपचं वाईट वेळ; जगण्यासाठी करतोय हे काम

मुंबई | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्य खूप संघर्ष करून यश मिळवत असतो. खूप कमी नशीबवान व्यक्ती असतात ज्या काहीच संघर्ष न करता प्रसिध्दी आणि पैसा कमवतात. बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक प्रसंग घडले आहेत जिथे उत्तम गुण असलेल्या कलाकारांना बॉलीवुड माफियांनी डावललं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या बाबत देखील हा प्रकार घडला आहे.

 

अभिनयाची उत्तम जण असून देखील त्याला अनेक कार्यक्रमात अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्याच्या कारकीर्दीत त्याला खूप डावलले गेले. त्यामुळे तो बऱ्याच गोष्टींमुळे नैराश्यात गेला होता. यात त्याने स्वतःचे जीवन संपवून घेतले. आता त्याच्याच प्रमाणे बॉलीवूडचा मोहनिश बहल हा अभिनेता देखील फार नैराश्यात आहे. त्याला देखील बॉलीवूड वारंवार डावलत आहे. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. मात्र आज त्याच्या हातात काहीच काम नाही.

 

नूतन या गाजलेल्या अभिनेत्रीचा तो पुत्र आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केलं आहे. मात्र आता त्याला हवे तसे काम मिळत नाही. एका मुखतीत त्याने त्याच्या मनातील खंत व्यक्त केली होती. यात तो म्हणाला होता की, ” मी खूप जिद्दी आहे. मला जे हवं आहे ते मी मेहणीतीने मिलवल आहे.

 

मात्र आता इंडस्ट्रीमध्ये मला कोणीच काम देत नाही. कामासाठी मी खूप वन वन करत आहे. मात्र मला खूप बेकार कामे मिळत आहेत. जी कामे करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मी चांगल्या कामाच्या शोधात आहे. मात्र मला सतत डावलले जात आहे. त्यामुळे मी नैराश्य आहे. ” असे त्याने सांगितले होते.

 

हम साथ साथ है या चित्रपटामध्ये त्याने सकारात्मक अभिनय केला होता. यात सर्वात मोठ्या भावाची भूमिका त्याने खूप गाजवली होती. त्याच्या या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले होते. त्याने आजवर सबसे बडा खिलाडी, राजा हिंदुस्थानी, कोयल, राजा की आयेगी बरात, फुल बने पथ्थर, वास्तव, क्यू की अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पानिपत या चित्रपटात त्याने बाळाजी बाजीराव हे पात्र साकारले होते.

 

त्याच्या पत्नीचे नाव एकता सोहनी आसे आहे. ती देखील एक अभिनेत्री आहे. तिने सोलाह सत्रा, खत्रा, हफ्ता बंद, वंश, युद्धपत, तहलका, शतरंज, गँग अशा चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. या दोघांना प्रनुतन आणि क्रिश अशी दोन मुलं देखील आहेत. सध्या मोहनिशचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. यात तो खूप वाईट आवस्थेत दिसत आहे. यामुळे त्याचे चाहते देखील फार चिंतेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button