एकेकाळी बॉलिवूड गाजविनाऱ्या सनी देओलवर आलीय खुपचं वाईट वेळ; कर्जाचे ओझे झाल्याने करतोय हे काम

दिल्ली | बेताब या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकलेला अभिनेता सनी देओल आज त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीमुळे यशाच्या मोठ्या शिखरावर आहे. आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धी बरोबरच त्याने बॉलीवूडमध्ये मोठा चहाता वर्ग देखील निर्माण केला. याच चाहत्या वर्गाचा त्याला साल 2019 च्या निवडणुकीत देखील फायदा झाला. या निवडणुकीमध्ये त्याने मोठ्या मतांनी विजय मिळवत बाजी मारली होती.

 

23 एप्रिल 2019 रोजी त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. गुरुदासपूर मतदारसंघातून त्याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेसचे सुनील राठोड त्याच्या विरोधात उभे होते. त्यांचा पराभूत करत सनीने 82 हजार 459 मतांनी विजय मिळवला होता. यावेळी सगळीकडे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर सनी बराच काळ चित्रपटांपासून दूर राहिला. निवडणुकीच्या काळात त्याच्या संपत्ती वरती प्रकाश टाकण्यात आला होता.

Advertisement

 

त्यावेळी समजले की त्याच्याकडे गडगंज स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. एकूण 82.40 कोटींची संपत्ती त्याच्याकडे होती. यामध्ये विविध महागडा गाड्यांचा देखील समावेश होता. या सर्व महागड्या गाड्यांमध्ये ऑडी मर्सिडीज अशा सर्व गाड्यांची नावे शामिल आहेत. 69 लाख कोटींच्या गाड्या त्याच्याकडे होत्या. त्याच्या पत्नीकडे देखील प्रचंड संपत्ती होती. मात्र काही दिवसांपूर्वी सनी विषयी एक दुखद बातमी समोर आली. यामध्ये त्याची प्रकृती ठीक नसल्याचे समजले. यासाठी तो सध्या परदेशात उपचार घेत आहे अशी माहिती देखील समजली होती.

Advertisement

 

याच दरम्यान सनी देओल याचे निधन झाले आहे अशी अफवा देखील समोर आली. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले होते. आता सनी देओल मोठ्या कर्जात बुडालेला आहे अशी माहिती समोर येत आहे. यामध्ये 1.38 कोटी एवढे सरकारी कर त्याच्याकडे थकीत असल्याचे समजले आहे. तसेच त्याच्या पत्नीवर देखील मोठ्या रकमेचे कर्ज आहे. यामुळे आता त्याचे चाहते मोठ्या चिंतेत आले आहेत. अनेकजण सनीची वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करत आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *