‘आई कुठे काय करते’ मालिके मधील आप्पांसोबत घडली खुपचं वाईट घटना

मुंबई | स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका त्यांच्या सीन्समुळे खूप चर्चेत असते. मात्र ही मालिका लवकर संपणार असल्याचे सध्या चर्चा रंगात आहेत. या मालिकेत भरपूर वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत.

 

जे बघण्याची इच्छा आता प्रेक्षकांच्यात नाही. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेला कंटाळ्याचे दिसतय.कांचन, ईशा, यश, गौरी, अभिषेक यांच्या पात्राला देखील प्रेक्षक खूप प्रेम देताना दिसत असतात. त्याचप्रमाणे या मालिकेमध्ये आप्पाची भूमिका देखील प्रचंड गाजली आहे.

Advertisement

 

अभिनेते किशोर महाबोले यांनी या मालिकेतील आप्पाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर किशोर महाबोले खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता.त्यांच्या मुलाचे लग्न असल्याचे त्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. तर सध्या किशोर महाबोले यांच्या बद्दल आश्चर्यजनक बातमी समोर आली आहे.

Advertisement

 

आई कुठे काय करते या मालिकेचे शूटिंग चालू असताना किशोर महाबोले हे आजारी होते. तरी देखील ते काम करत होते. त्यामुळे त्यांचे खूप कौतुक देखील होत होते. मिलिंद गवळी यांनी या विषयी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये मिलिंद यांनी लिहलं होते कि, अंगात ताप असताना देखील किशोर महाबोले काम करत होते. त्यामुळे या मालिकेच्या टीमला त्यांचे खूप कौतुक आहे.

 

मात्र काही दिवसांसाठी किशोर महाबोले उर्फ आप्पा यांनी या मालिकेमधून ब्रेक घेतला आहे. मालिका देखील आता खूप वेगळ्या दिशेने जाताना दिसतेय. त्यामुळे किशोर महाबोले काही दिवस आराम करून पुन्हा मालिकेत दिसणार आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *