अमृता फडणवीस यांच्या हिंदी चित्रपटातील गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रात देखील आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे त्या विविध राजकीय तसेच सामाजिक घटनांबाबत सोशल मीडियावरून त्या परखडपणे आपली मते मांडताना दिसतात.

Join WhatsApp Group

 

अमृता फडणवीस यांचे संगीतावर असणारे प्रेम सर्वश्रुत असून त्यांनी गायन क्षेत्रात आपली एक स्वतंत्र आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता संगीत क्षेत्रात एक पाऊल पुढे नेत, हिंदी चित्रपटात देखील त्यांनी गाणे गायले आहे. दिग्दर्शक अभय निहलानी यांच्या ‘लव्ह यू लोकतंत्र’ या हिंदी चित्रपटात प्रसिद्ध गायक शान यांच्यासोबत त्यांनी गायलेल्या गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

 

 

लव्ह यू लोकतंत्र या चित्रपटात अभिनेता अमीत कुमार यांनी अप्रतिम अभिनय केला असून अभिनेत्री स्नेहा उल्लाल, ईशा कोप्पीकर, रवी किशन (एमपी), मनोज जोशी, अली असगर, कृष्णा अभिषेक, सपना चौधरी, सुधीर पांडे, दयाशंकर पांडे, सुहासिनी मुळे, राज प्रेमी, हितेश संपत, राज ओझा यांसारखे प्रमुख बॉलीवूड कलाकार आहेत.

 

आघाडीच्या चित्रपट समीक्षक आणि विश्लेषकांनी हा बॉलीवूडचा ब्लॉकबस्टर ठरेल असा अंदाज वर्तवला आहे आणि सुरुवातीच्या पुनरावलोकनांमध्ये असे म्हटले आहे की या चित्रपटात चांगल्या मनोरंजनाचे सर्व घटक आहेत आणि बॉलीवूडच्या चाहत्यांना तसेच सामान्य प्रेक्षकांना तो आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button