मनवा नाईकसोबत घडला धक्कादायक प्रकार.. उबर ड्रायव्हरने केलं अस काही… अभिनेत्रीने पोस्ट लिहून सांगितलं अनुभव..

मुंबई | मनवा नाईक हिने अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. बा बहू और बेबी ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तीन बहुरानिया ही मालिकाही तिला यशोशिखरावर नेऊन ठेवण्यात यशस्वी ठरली. मराठी चित्रपटात देखील तिने काम केलेले आहे. फक्त लढ म्हणा तिचा हा चित्रपट लोकप्रिय ठरला होता. याच अभिनेत्रिला एका ड्रायव्हरन अरेरावीच्या भाषेत हुज्जत घातली. तो अनुभव मनवा नाईकने फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिलीय.
अभिनेत्रीने लिहिली फेसबुक पोस्ट:
अभिनेत्रीने फेसबुक पोस्टमध्ये लिहलंय, ”माझ्यासोबत घडलेला हा भयानक प्रसंग तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे. मी रात्री 8.15 ला उबर घेतली.
बीकेसीमध्ये येताच उबर चालक फोनवर बोलू लागला. मी त्याला फोन ठेवण्याचा सल्ला दिला. बीकेसी सिग्नलवर त्याने सिग्नलदेखील मोडला. हे सर्व करण्यापासून मी त्याला वारंवार थांबवलं परंतु तो ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. दरम्यान वाहतूक पोलिसांनी त्याला अडवलं. फोटोही क्लिक केला परंतु उबर चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
यामध्ये हस्तक्षेप करत मी पोलिसांना सांगितलं, गाडीचा फोटो आधीच क्लिक केला आहे त्यामुळे त्याला आता जाऊ द्या. परंतु हे ऐकून उबर चालकाला राग आला. तो म्हणाला, ‘तू भरणार काय 500 रुपये’? मी म्हटलं, ‘तू फोनवर बोलत होतास ‘
उबर पुढे सरकली. तसतसा उबर चालक मला धमक्या देऊ लागला.. ‘रुख तेरेको दिखता हू’. मी त्याला वारंवार गाडी पोलीस स्टेशनलाघ्यायची विनंती केली. परंतु त्याने तसं न करता बीकेसीच्या जिओ गार्डन जवळ एका काळोखच्या ठिकाणी उबेर थांबवण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा गाडी पोलीस स्टेशनला घेण्यास सांगितलं.तो मधेमधे गाडी थांबवून माझ्याशी वाद घालत होता, धमकी देत होता.
परंतु त्याने पुन्हा गाडी पुढे घेतली. यादरम्यान आम्ही वाद घालत राहिलो.. त्याने वेगाने गाडी चालवली. बीकेसी कुर्ला पुलावर त्याने पुन्हा उबेर थांबवण्याचा प्रयत्न केला, तो मला म्हणाला, काय करणार, थांब दाखवतो तुला’.
मी उबर सेफ्टी ला फोन केला.ग्राहक सेवा कर्मचारी कॉलवर असताना…उबर चालकाने चुनाभट्टी रोडवरून प्रियदर्शनी पार्कपर्यंत धाव घेतली.मी ड्रायव्हरला थांबण्यास सांगितले त्याने ऐकलं नाही. तो कोणाला तरी हाक मारु लागला…मी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. यावेळी 2 दुचाकीस्वार आणि 1 रिक्षावाल्याने उबेरचा ताबा घेतला.त्यांनी गाडी थांबवून मला गाडीतून बाहेर काढलं. मी सुरक्षित होते; पण जरासा घाबरलेली होती.