‘ते मला घाणेरडे इशारे करायचे…’ चित्रपटात काम मिळविण्याच्या नादात या अभिनेत्री सोबत घडला धक्कादायक प्रकार

दिल्ली | अभियन क्षेत्रात कस्टींग काउच काय आहे हे जवजवळ सगळ्यांचं माहित आहे. यामध्ये अभिनेत्रीला काम द्यायचे की नाही हे तिने तिच्यावर लावण्यात आलेल्या चुकीच्या अटी पूर्ण केल्यास ठवरले जाते. यामुळे अनेक अभिनेत्री ती मालिका अथवा तो चित्रपट सोडून देतात. अभिनेत्री श्वेता केसवानी सध्या हॉलिवूडमधील अभिनय विश्वात नाव शोधण्याच्या प्रयत्नात आहे. श्वेता अमेरिकेतील प्रसिद्ध शो द ब्लॅकलिस्टमध्येही दिसली आहे. तिने हिंदी मालिका विश्वात मोठे नाव कमवले आहे. अभिमान’, ‘कहानी घर घर की’ आणि ‘देश में निकला होगा चांद’ या आणि अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये तिने काम केले आहे.
आपल्या अभियन्याच्या जोरावर छोट्या पडद्यावरून थेट हॉलीवूडमध्ये झेप घेणाऱ्या या अभिनेत्रीला देखील कस्टींग काऊचचा खूप वाईट अनुभव आला आहे. नुकतीच तिने एका माध्यमाला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या बरोबर घडलेल्या दुःखद घटना समोर आणल्या. तिने सांगितले की, “होय मी बॉलिवूडमध्ये नक्कीच काम केले आहे. पण मी अनेक चित्रपट सोडले.
कारण तिथल्या कास्टिंग दरम्यान मला सांगण्यात आले होते की तुला बाहेरच्या शूटसाठी एकटे यावे लागेल आणि त्यावेळी मी आईसोबत प्रवास करत होते. मी फक्त 18 वर्षांची होते म्हणून मी शुटींगला आई बरोबर जायचे.” पुढे तिने सांगितले की, निर्मात्यांचे सगळे ऐकायचे कधी दिग्दर्शकाची आज्ञा पाळायची, दिग्दर्शकासोबत एकांतात वेळ घालवायचा, असे अनेकवेळा सांगण्यात आले. मग जिथे अशा अटी होत्या, तिथे मी चित्रपट मधेच सोडून दिले. कास्टिंग काउच आहे हे असं असतं हे मला माहीत होतं. मला हातवारे करून इशारे केले जात होते आणि मी या सगळ्यासाठी तयार नव्हते. म्हणूनच मी चित्रपटांमध्ये कमी काम केले कारण हे माझ्यासोबत अनेक चित्रपटांदरम्यान घडले.”
पुढे ती म्हणाली की, ” त्यानंतर मी टेलिव्हिजनमध्ये काम करण्यास सुरुवात केली कारण त्यावेळी टेलिव्हिजनमध्ये एवढी वाईट वागणूक नव्हती. मला विश्वास आहे की जेव्हा तुम्हाला हे चुकीचे मार्ग सांगितले जातात तेव्हा काही चुकीचे घडण्यापूर्वी थांबा आणि थेट निर्णय घ्या, अशा ठिकाणी काम करू नका.” अशा पद्धतीने तिने आपल्या आयुष्यातील कास्टिंग काउचचे रहस्य सांगितले. सध्या ती अमेरिकेत तिच्या कुटुंबाबरोबर राहते. तसेच ती हॉलीवूडमध्ये कामाच्या शोधत आहे.