प्रसिद्ध निर्मात्यानं आपल्या बायकोला मारण्याचा रचला कट…

मुंबई | बॉलिवूडमध्ये गेले अनेक वर्षे काय घडेल हे सांगता येणार नाही. बऱ्याचदा काही भागातून मुंबईत काही मुली आपलं नशीब आजमावण्यासाठी या क्षेत्रात येत असतात. अशावेळी काही निर्माते दिग्दर्शक चित्रपटात काम देतो म्हणून त्या मुलींचा शारीरिक वापर करतात. हे आज नाही तर गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशीच घटना घडली आहे.
बॉलिवूड मधून अशीच एक घटना समोर आली आहे . प्रसिद्ध निर्मात्याने आपल्या बायकोच्या अंगावर गाडी घालून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहिती नुसार किशोर मिश्रा हे एक निर्माते आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे बनवले आहेत. भुतियापा , शर्मा जी की लग गयी,देहाती डिस्को ,खाली बली या सारख्या सिनेमाचे निर्माण केले.
19 ऑक्टोंबर रोजी मिश्रा अणि पत्नी बाहेरून आले. मिश्रा यांनी आपल्या पत्नीला घरी सोडले व त्यांची प्रियसी असणाऱ्या मॉडेलला बोलावले.ही गोष्ट त्यांच्या पत्नीच्या लक्षात आली त्या पुन्हा माघारी गाडीकडे गेल्या तर मॉडेल आणि त्यांच्या पतीचा रोमान्स चालू होता.मिश्रा यांच्या पत्नीने त्यांना गाडीची काच खाली घ्यायला लावली .तर त्यांनी काच खाली घेतली नाही उलट गाडी चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मिश्रा यांनी कोणता ही विचार न करता गाडी सरळ आपल्या पत्नीच्या अंगावर घातली. यामध्ये त्यांच्या पत्नीला जबर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला ही जबर मार लागला. तेथेच असणाऱ्या काही लोकांनी त्यांना वाचवले व जवळच्या रुग्णालयात दाखल केले. काल त्यांनीं मुंबई मधील आंबोली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलीये.