प्रसिध्द मराठी अभिनेत्रीचा मुलगा रस्त्यावर चालवतो हॉटेलचा गाडा; पावभाजी आहे फेमस

मुंबई | कलाकारांप्रमाणेच त्यांची मुलं देखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अशात बॉलीवूड कलाकारांमध्ये अनेकांची मुलं ही परंपरेनुसार अभिनय क्षेत्रातच कार्यरत आहेत. मात्र मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची मुलं याला अपवाद ठरत आहेत. मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मुले ही आपल्या नशीब वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आजमवताना दिसत आहेत.
त्यातीलच एक सुप्रिया पाठारे यांचा मुलगा. सुप्रिया यांच्या मुलाचे नाव मिहीर अस आहे. आपल्याला आवडतं तेच आणि इतरांपेक्षा थोडं हटके असं काहीतरी करण्याचा त्यांन प्रयत्न केला आहे. मेहेरला जेवण बनवणं आणि आपली चव इतरांना चाखायला देणार हे खूप आवडतं. अमेरिकेमध्ये जाऊन त्याने शेफ विषयाचा अभ्यास केला आहे.
तसेच शेफ बनवून तो आता मायदेशी परतला आहे. आता एका अभिनेत्री चा मुलगा म्हटल्यावर त्याने एखादं मोठं हॉटेल टाकलं असेल असं तुम्हाला वाटत असेल. मात्र जरा थांबा, कारण विहीरने हॉटेल नाही तर चक्क जेवणाची गाडी सुरू केली आहे. ही गाडी तो ठाणे शहरामध्ये फिरवतो. त्याच्या एका मित्राच्या साथीने त्याने ही गाडी सुरू केली आहे. त्याच्या या गाडीमध्ये स्पेशल पाव भाजी मिळते.
ही स्पेशल पाव भाजी ठाण्यातील खवय्यांना चाखायला मिळेल. त्याच्या या गाडीच नाव “महाराज” असं आहे. 14 जुलै रोजी त्याच्या या गाडीचे उद्घाटन झालं. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार तिथे उपस्थित होते. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. ग्ल्याडी अलवारीस रोड, खेवरा सरकल, ठाणे पश्चिम येथे हा व्यवसाय त्याने थाटला आहे.
सुप्रिया पाठारे या ठिपक्याची रांगोळी या मालिकेमध्ये सध्या कार्यरत आहेत. या मालिकेमध्ये त्या माधवी कानेटकर म्हणजेच माईची भूमिका साकारतात. या पात्राला त्यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे. त्यांचा अभिनय खूप दांडगा आहे. फु बाई फु मध्ये देखील त्यांनी बराच काळ काम केलं.
त्यांना बऱ्याचदा खाल्लं नाही त्याची भूमिका मिळाली. पुढचं पाऊल या मालिकेमध्ये त्यांनी कांचनमाला बाईची भूमिका साकारली होती. ही भूमिका त्यांची प्रचंड गाजली. याच मालिकेने त्यांना घराघरात पोहोचवले. त्यांच्या बहिण अर्चना नेवरेकर यादेखील मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आहेत. अर्चना यांनी देखील मराठी सिनेसृष्टीत मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी सुरुवातीला मोठे हालाखीचे जीवन जगले. मात्र आता दोन्हीही बहिणी मराठी सिनेसृष्टी चांगली गाजवत आहे.