टीम इंडियाला मोठा धक्का! वीजा मिळत नसल्याने या दोन दिग्गज खेळाडूंना खेळता येणार नाही विश्वचषक

मुंबई | 16 ऑक्टोंबरला T-20 विश्वचषकास प्रारंभ होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा भारताचा पहीला सामना 23 ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियात होणार आहे. यामुळं सद्या खेळाडू सराव करत आहेत. वॉर्म अप सामने देखील खेळले जात आहेत. यातच आता भारताच्या दोन खेळाडूंना वीजा नसल्यानं यंदाचा T-20 सामना खेळता येईल का..? असा प्रश्न उपस्थित झालाय.
कोण आहेत ते दोन खेळाडू – वीजा नसल्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतातील उमरान मलिक, कुलदीप सेन या दोन खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाता येणार नाही. काही महिन्यांपूर्वी वीजासाठी मागणी केली होती परंतु अजूनही वीजा आला नाही. उमरान मलिक आणि कुलदीप सेन या दोन गोलंदाजांना टी 20 वर्ल्ड कपसाठी नेट बॉलर म्हणून निवडलं गेलय. उमरान हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरकडून खेळतोय. तर कुलदीप सेन मध्यप्रदेशकडून खेळला.
आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन – उमरान आयपीएलमधून चर्चेत आला होता. आयपीएमध्ये 157 किमीप्रतितास वेगान गोलंदाजी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि कुलदीप सेन हे तिघे 6 ऑक्टोबरलाच टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होते.
रिझर्व्ह खेळाडूंसोबत रवाना होणार – मोहम्मद सिराजची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी निवड करण्यात आली होती. उमरान आणि कुलदीप वीजा कारणामुळे अजून जाऊ शकलेले नाहीत. आता दोघेही रिझर्व्ह खेळाडूंसोबत रवाना होतील, अशी शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी अतिशय वेगवान आणि सपाट आहे. कुलदीप सिंग आणि उमरान मलिक अतिशय वेगवान गोलंदाजी करतात. ते दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेले तर अशा स्थितीत टीम इंडियाला सरावात मोठी मदत मिळू शकते.