वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियाला मोठा दणका

ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड अशा दोन संघात T-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव झालाय. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियान विजयाची अशा सोडली आणि कॅनबरामध्ये इंग्लंड हा संघ विजयी झाला. यामुळं त्यांनी T-20 मालिकेत इंग्लंडनं 8 धावांनी विजय संपादन केलाय. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा आत्मविश्वास ढासळताना दिसतोय. इंग्लंडन मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. फलंदाजी करताना इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य दिल होत.
इंग्लंडची सुरुवातीला दैनी अवस्था – प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात समाधानकारक झाली नाही आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्यांनी कर्णधार जोस बटलरची विकेट गमावली. यानंतर पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ॲलेक्स हेल्सलाही पायचीत करण्यात आले.
21 धावांत 2 विकेट पडल्यानंतर इंग्लंडला डाव सांभाळण्याची गरज होती. मात्र, 53 धावांच्या स्कोअरवर त्याने बेन स्टोक्सच्या रूपान तिसरी विकेटही गमावली. स्टोक्स बाद झाल्यानंतर एकूण धावसंख्येत फक्त एक धाव जोडली गेली होती की हॅरी ब्रूकही बाद झाला. 54 धावांत चार गडी बाद झाले. त्यानंतर डेविड मलान आणि मोइन अलीने डाव सावरला. दोघांनी मिळून धावसंख्या 146 पर्यंत पोहोचवली.
डेविड मलानला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार -20 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियन 170 धावा केल्या. त्यानंतर या सामन्यात 49 चेंडूत 82 धावा करणारा डेविड मलान याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर इंग्लंडने 54 धावात 4 विकेट गमावल्या होत्या. मलानने 7 चौकार 4 षटकार मारले.