Maharashtra Mega Bharati 2026 | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रशासनावर मोठा ताण आला आहे. आणि यामुळे नागरी विकास कामांमध्ये दिरंगाई होताना पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तब्बल १ लाख १२ हजार ७६९ रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत, अशी घोषणा विधानसभेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ही भरती राज्य शासनाच्या मार्फत टप्प्या टप्प्याने भरली जाणार आहे, यामध्ये अनेक पदांचा समावेश असू शकतो. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना संबंधित पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे, यामुळे अनेक संस्थांमध्ये नागरी कामकाजात अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे दिरंगाई पाहायला मिळत आहे.
वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील ही पदे भरण्यात येणार आहेत, त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगर पालिकांमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत, पदांच्या नावांची आणखी घोषणा करण्यात आली नाही. मात्र अनेक विविध पद या भरतीत भरली जाणार आहेत. लिपिक शिपाई तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश केला जाऊ शकतो अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ८ ते १० टप्प्यात या भरती प्रक्रियेचे प्रयोजन केले जाऊ शकते. ही भरती प्रक्रिया सरळसेवेतून निघणार आहे. यामध्ये १० वी पास १२ वी पास आणि पदवी झालेले उमेदवार पात्र असू शकतात.
यातील काही जागा १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी रिक्त आहेत तर काही जागा पदवी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. यामध्ये अनेक जागा आहेत, त्यात स्थापत्य अभियांत्रिकी, लिपिक, प्रशासन अधिकारी, शिक्षक, आरोग्य विभाग कर्मचारी, शिपाई स्वच्छता कर्मचारी अशा अनेक जागा रिक्त आहेत. स्त्रियांसाठी आणि इतर मागासवर्गीयांसाठी विशेष आरक्षित जागा आहेत. त्यामुळे याचा लाभ या वर्गातील तरुणांना होणार आहे. तसेच विशेष स्किल असणाऱ्या उमेदवारांसाठी देखील या भरती प्रक्रियेत जागा असणार आहेत. अनुभव असलेल्या उमेदवारांना देखील या भरतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जाऊ शकते. अनुभवाच्या बळावर अनेक उमेदवार सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत आहेत. त्यामुळे अनुभविक विद्यार्थ्याना देखील या भरतीचा लाभ मिळणार आहे.
Railway Bharati 2026: दहावी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी; तब्बल ५३०० पदांसाठी मेगा भरती
संबंधित भरती ही सध्या प्रशासकीय प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षण संस्था, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन, लेखा विभाग आणि वित्त विभाग यातील पदे आहेत. प्रशासनाने भरती प्रक्रियेचा आलेख तयार केला आहे. आणि ही भरती ज्या संस्थांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात लवकरच या भरतीची सुरुवात केली जाऊ शकते. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षण संस्थेत शिक्षकांची देखील भरती होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार शिक्षक होण्यासाठी पात्र आहेत अशा उमेदवारांना या भरतीमध्ये संधी मिळणार आहे. मात्र अद्याप कोणत्या विभागाची किती पदे भरली जाणार आहेत? याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र पुढील काही काळात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
संबंधित भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी यासाठी शासनाच्या मार्फत विशेष काळजी घेतली जात आहे. उमेदवारांना आरक्षण योग्य मिळावं यासाठी देखील शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या भरती प्रक्रियेची नेमकी तारीख आणखी प्रसिद्ध करण्यात आली नाही. मात्र शासन स्तरावरील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये या भरतीची घोषणा शासनाच्या माध्यमातून केली जाऊ शकते. शासनाच्या मुख्य संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. लेखी परीक्षेच्या माध्यमातून पदे भरली जाणार आहेत. काही पदांमध्ये मुलाखतीची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र त्या पदांची नावे समोर आली नाहीत.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षक भरतीतील उमेदवारांची पवित्र पोर्टल द्वारे भरती प्रक्रिया राबविली जाऊ शकते. त्यासाठी Talt किंवा पात्र परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक राहणार आहे. जे उमेदवार स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत, अशा विद्यार्थ्यांना एक संधी मिळाली आहे, त्यांनी लगेच या भरतीमधील पदांसाठी लागणारा अभ्यास सुरू करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन राहणार आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शुल्क हे त्यांच्या वर्गानुसार ठरवले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी तयारीला लागण गरजेच आहे.

FAQ – कायम विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न (Maharashtra Mega Bharati 2026)
भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे का?
उत्तर – आणखी जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
भरतीची घोषणा कोणी केली आहे?
उत्तर – भरतीची घोषणा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली आहे.
भरतीमध्ये किती जागा आहेत?
उत्तर – स्थानिक स्वराज्य संस्थेमधील १ लाख १२ हजार ७६९ जागा रिक्त आहेत.
१ लाख १२ हजार जागा एकदाच भरल्या जातील का?
उत्तर – नाही, याची भरती टप्पा टप्प्याने केली जाईल.
भरतीची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल?
उत्तर – सांगता येत नाही पण शासन सध्या यावर काम करत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय?
उत्तर – नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था असतात.









