UPI च्या काही नियमात बदल, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम; PhonePay, Google Pay, Paytm Rules Change

February 23, 2026 3:21 PM

Upi Rules Change 2026 । देशात दिवसेंदिवस ऑनलाइन म्हणजेच मोबाईल वरून पेमेंट करणे झपाट्याने वाढले आहे. सोबत कॅश न ठेवता ऑनलाइन पेमेंट करत आहेत. १ रुपया पासून ते १ लाख रुपयांपर्यंत पेमेंट UPI च्या माध्यमातून केले जात आहे. छोट्या दुकानांमधून छोटीशी वस्तू जरी घेतली तरी त्याचे पेमेंट ऑनलाइन केल जातय. त्यामुळे कॅश चोरी होणं हरवणे या सारख्या नुकसानी पासून ग्राहकांचा बचाव होत आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये UPI पेमेंट संधर्भात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामुळे याचा फायदा तोटा आणि इतर काय काय परिणाम आपल्यावर होणार याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. यूपी पेमेंट इशू करणाऱ्या अनेक कंपन्या सध्या आहेत. यातील जास्त वापरास येणारी कंपनी म्हणजे PhonePay तसेच त्यांनंतर GooglePay देखील चांगले पॉपुलर झाले आहे. Paytm आणि Bhim Upi सारखे वर्जन ऑनलाइन पेमेंट साठी वापरले जातात.

या महत्वाच्या नियमात बदल –
१) upi वापरणाऱ्यासाठी पहिला महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्यात असलेली रक्कम तुम्हाला दिवसातून फक्त ५० वेळा पाहता येणार आहे. हे सर्व upi ऍप साठी महत्वाचा नियम आणण्यास आला आहे. जर तुम्ही २ upi ऍप वापरत असाल तर तोच बँक balance तुम्ही १०० वेळा चेक करू शकता.

२) यातील केलेला सर्वात महत्त्वाचा दुसरा बदल म्हणजे तुमच्या upi शी सलग्न असलेले बँक खाते डैटेल्स तुम्ही दिवसातून फक्त २५ वेळा पाहू शकता. जर तुम्ही दोन upi ऍप वापरत असेल तर त्यामध्ये तुम्ही ५० वेळा डिटेल पाहू शकता. हा एक महत्वाचा बदल मानला जात आहे.

हे बदल करण्याची कारणे काय आहेत?
वारंवार बैलेंस चेक केल्याने बँकेच्या सर्व्हरवर ताण येतोय आणि तो ताण असल्यामुळे सर्व्हर गतीने काम करत नाही. आणि यामुळे हे महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलणे जलत गतीने पेमेंट करण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात.

UPI वरून खर्च करताना पैसे सेव्हिंग होत नाहीत?
UPI ऑनलाईन पेमेंट मुळे प्रत्येकाचा खर्च जास्त होत आहे. अनेक आर्थिक सल्लागारांच्या म्हणण्यानुसार कॅश मध्ये व्यवहार कमी व्हायचे मात्र upi बाजारात आल्या पासून व्यवहार मोठी वाढ झाली आहे. पैसे खर्च होताना कळत नाही, मात्र दिवसाचा हिशोब केल्यानंतर झालेला खर्च पाहून अनेकजण चक्रावतात. त्यामुळे UPI वरून पैसे खर्च करताना पैशांची बचत होत नाही.

१०, २०, ३०, ५०, १०० असे transaction होत असल्याने पैसे किती जात आहेत. हे कळत नाही. आणि गरजे पेक्षा जास्त पैसे खर्च होतात. आपल्या सोबत पॉकेट पेक्षा जास्त वेळ मोबाईल असतो आणि या मोबाईल मध्ये upi ऍप असतात. एखादी गोष्ट घेताना पुढचा मागचा काही विचार येत नाही. आणि लगेच मोबाईल काढून त्यावरून पेमेंट केले जाते. यामुळे अनेकांचे खिसे लवकर मोकळे होतात.

UPI वापरताना कोणत्या बँकेचे खाते असावे किंवा कोणते ऍप सर्वाधिक सुरक्षित आहे? PhonePay, Google Pay, Paytm Rules Change

तुम्ही राष्ट्रीयकृत किंवा प्रायव्हेट बँकेतील कोणत्याही खात्याला तुमच्या upi ला लिंक करू शकता. मात्र HDFC Bank आणि Axis Bank या सारख्या बँकांच्या सर्व्हरला कमी प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुमचे या बँकेत खाते असेल तर त्यावरून व्यवहार करणे फायद्याचे ठरू शकते. स्टेट बँक आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांना कामाचा लोड जास्त असतो त्यामुळे त्यांच्या सर्व्हरला वारंवार प्रॉब्लेम असतो. त्यामुळे upi वरून पेमेंट करताना अनेक प्रॉब्लेमचा सामना करावा लागू शकतो. मात्र राष्ट्रीयकृत बँका आणि प्रायव्हेट बँका upi फास्ट पेमेंट साठी कायम प्रयत्नशील असतात. त्यामुळे कोणत्याही बँकेत खाते असेल तर तुम्ही आता जलद व्यवहार करू शकता.

UPI ऑनलाईन पेमेंट साठी अनेक ऍप उपलब्ध आहेत. त्यात phonePay, Google Pay, Paytm या सारख्या बड्या कंपन्यांचा सहभाग आहे. यापैकी कोणतेही UPI ऍप वापरणे सुरक्षित आहे. या ऍप चालू करण्याच्या पूर्वी RBI च्या माध्यमातून अनेक परमिशन संबंधित कंपन्यांना घ्याव्या लागल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही UPI ऍप चा तुम्ही वापर करू शकता.

UPI payment चा वापर करताना या गोष्टींची काळजी घ्या
तुम्ही ज्या upi वर पैसे टाकणार आहात. तो upi ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचाच आहे का? हे सर्वात अगोदर तपासून घ्या. त्याच प्रमाणे ज्या स्कॅनर वर पेमेंट करत आहात तो स्कॅनर समोरच्याचा आहे का? तुमचे upi अँप कोणी लॉगिन करण्याचा प्रयत्न करत आहे का? असेल तर त्याला otp वैगेरे काहीच देऊ नका. Request payment method वापरताना विशेष काळजी घ्या ज्याला पेमेंट द्यायचे आहे त्यानेच request टाकली आहे का? हे अगोदर तपासून घ्या आणि नंतरच तुम्ही पेमेंट प्रोसेस करा.

UPI वरुण केलेले पेमेंट समोरच्याला गेले नाही आणि बँकेतून पैसे डेबिट झालेत अशावेळी घाबरू नका. कोणत्या तरी एका प्रॉब्लेममुळे हे झालेलं असत. ते पैसे refund होण्याची वाट पहा. एकतर ज्याला तुम्ही पेमेंट केले आहे त्याच्या खात्यावर पैसे जमा होतील. किंवा ज्या खात्यामधून तुम्ही पेमेंट केले आहे. त्या खात्यात पेमेंट परत येईल. त्यामुळे घाबरून जाऊ नका. २४ तासात जर पैसे refund झाले नाहीत तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन त्याची तक्रार करा.

बँकेच्या मदतीने ते पैसे परत येतील. टेक्निकल प्रोब्लेमुळे पेमेंट करताना बऱ्याच वेळा असे घडते. मात्र ही तुमच्या सोबत झालेली फसवणूक नाही. तर हा एक बँकेचा किंवा त्या upi ऍप चा टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. तुमचे पैसे सुरक्षित असतात. बँकेत तक्रार केल्यानंतर अवघ्या काही तासातच ते पैसे तुमच्या अकाउंट ला परत जमा होतील.

UPI फसवणूक झाल्यावर काय करावे?
जर तुमची सायबर गुन्हेगारांकडून upi च्या माध्यमातून फसवणूक झाली तर तुम्ही तात्काळ याची माहिती तुमच्या बँकेला द्या. बँक ज्याने फसवणूक केली आहे. त्याचे अकाऊंट होल्ड करेल. त्यानंतर तुम्ही जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकरणाची तक्रार करा. पोलिसांच्या मदतीने बँक तुमचे पैसे परत आणण्यासाठी प्रयत्न करेल. आणि काही दिवसातच तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील.

 

Mr. Ganesh Chavan

Ganesh Tanaji Chavan is a digital media professional and founder of Maharashtra Update. He has experience working with Pudhari Media Group and Loksatta.com, delivering reliable news, government scheme updates, and job information across Maharashtra. His mission is to provide accurate and trustworthy information to readers.

Subscribe YouTube

Subscribe

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment