धक्कादायक! मला मुलगा नको मुलगी हवी आहे, म्हणत बापाने १ वर्षाच्या मुलाला उचलुन आपटून केली हत्या; नागपूर मधील घटना

नागपूर | मुलगा होण्यासाठी व्रत ठेवणे, बोकड कापणे, उपवास पकडणे, देवाकडे नवस करणे अशा घटना आपण वारंवार पाहत आलो आहे. मात्र मला मुलगा नको मुलगी हवी आहे. अशी घटना प्रथम घडताना पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या आवारात घडलेल्या घटनेने पूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला आहे.

 

सत्यम कौरती (वय – ०१) नावाच्या चिमुकल्याला त्याच्या बापानेच दगडावर आपटून हत्या केली आहे. सदर आरोपीचे नाव भजन कौरती असे आहे. भजन हा त्याच्या बायको सोबत भांडण करुन मुलगी होण्याची इच्छा वारंवार व्यक्त करत होता. मात्र मुलगी होण्याच्या ऐवजी मुलगा झाला, मुलगा एक वर्षाचा झाल्यानंतर भजन आणि त्याच्या बायकोचे भांडण सुरू झाले.

Advertisement

 

भांडण मोठ्या स्वरूपाचे असल्याने त्या बापाने आपल्या मुलाला उचलले आणि जोरात दगडावर आपटले, यात त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पूर्ण नागपूर जिल्हयात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच नराधमाला फाशीची शिक्षा द्या. अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Advertisement

 

भजन याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. त्याची पुढील चौकशी सुरू आहे. वंशाचा दिवा नको तर वंशाची पणती हवी आहे. असे म्हणत त्याने दिव्याला विझवून टाकले आहे. मृत मुलाची आई पूर्ण खचून गेल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *