कोरोना होणार हद्दपार; जूनमध्ये तब्बल १२ कोटी डोस

नवी दिल्ली | केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार जूनमध्ये लसीचे अतिरिक्त डोस उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती दिली आहे. देशातील विविध घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना मे महिन्यात एकूण ७.९४ कोटी लसीचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये राज्य व केंद्र सरकारचे आरोग्य सेवेतील कर्मचारी, तसेच ४५ वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती यांना ही लस देण्यात येणार आहे.
याशिवाय देशातील खाजगी रुग्णालयांना जूनमध्ये ५.६८ कोटी लस विकत देण्यात येतील. या प्रमाणे पुढील महिन्यात एकूण साधारणपणे बारा कोटी लस उपलब्ध होणार आहे, असे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. या लासीनचे वाटप करण्यापूर्वी सर्व राज्यांना वेळेवर कळवण्यात येणार आहे. प्रत्येक राज्याच्या वाटयाला येणाऱ्या लसी व्यर्थ वाया जाऊ नये.
यासाठी राज्य सरकारने आपल्या संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये लसीकरणातची गती, देशातील लोकसंख्या व वाया जाणाऱ्या लसीचे प्रमाण या निकषावर लस वाटप करण्यात येईल. जून महिन्यात कोबी शिल्ड लसीचे १० कोटी लस वितरित करता येतील, अशी माहिती पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला दिली आहे.